मराठीतून इंग्रजीमध्ये पुस्तक अनुवाद सेवा
ProofreadingServices.com लेखकांना नवीन वाचकांपर्यंत पोहोचून आपला खप वाढवण्यासाठी मदत करण्यास कल्पनारम्य तसेच सत्याधारित पुस्तकांची अनुवाद सेवा उपलब्ध करून देते. आमची व्यावसायिक भाषांतर सेवा स्वयंचलित नाही तर १००% मानवी आहे आणि म्हणूनच तुमची लेखनशैली जपून आम्ही उत्कृष्ट दर्जाचे भाषांतर प्रदान करण्याचा अभिमान बाळगतो.
साहित्यिक अनुवादाच्या किमतीचा अंदाज मिळवण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा.
तुमच्या मराठी पुस्तकाचा इंग्रजीत अनुवाद का करावा?
तुम्ही आपले पुस्तक लिहिण्यासाठी अनेक महिने किंवा वर्षे घालवली आहेत, तर मग केवळ मराठीच प्रकाशित करून त्याचा प्रभाव सीमित का होऊ द्यावा? मराठी न वाचणार्या कोट्यावधी लोकांपर्यंत पोहोचण्याचा उत्तम उपाय म्हणजे तुमच्या पुस्तकाचा इंग्रजीत अनुवाद करणे. व्यावसायिक इंग्रजी अनुवादाने तुमचे वाचक आणि तुमचा खपदेखील वाढण्यास मदत होईल.
आम्ही कोणकोणत्या प्रकारच्या भाषांतर सेवा प्रदान करतो?
आम्ही मराठीतून यूएस किंवा यूके इंग्रजीमधील अनुवाद करतो ज्याचे इंग्रजी भाषेच्या सहकार्यांकडून वेगळे प्रूफरीडिंगदेखील केले जाते. इतर ठिकाणी तुमच्या पुस्तकांचा केवळ अनुवाद केला जातो पण आम्ही अनुवाद केल्यानंतर ती प्रत एका इंग्रजी तज्ञाकडे पाठवून त्यातील तुटक किंवा विचित्र वाक्यरचना आणि भाषा सुधारतो. ProofreadingServices.com ही एक प्रूफरीडिंग आणि संकलन सेवा म्हणून सुरू करण्यात आली असल्याने जगभरातील सर्वोत्तम इंग्रजी तज्ञ आमच्या या सेवेचा भाग आहेत.
आम्ही कोणकोणत्या प्रकारच्या पुस्तकांचा अनुवाद करतो?
आम्ही जगभरातील लेखकांच्या कादंबर्या, कथेतर लिखाण, बालसाहित्य, आणि इतर बर्याच लिखाणाचा अनुवाद करतो. आमची वैशिष्ट्ये...
- साहित्यिक पुस्तके, जसे की सायन्स फिक्शन कादंबर्या, गूढकथा, प्रणयकथा, आणि कल्पनारम्य ऐतिहासिक पुस्तके
- शैक्षणिक पुस्तके, जसे की तत्त्वज्ञान, इतिहास, विज्ञान, आणि इतर विषयांवरील लिखाण
- व्यावसायिक पुस्तके, जसे की उत्पादकता, वैचारिक नेतृत्व व इतर विषयांवर आधारित ईबुक्स
आम्ही विविध साहित्यप्रकार व विषयांमध्ये लिखाण केलेल्या हजारो लेखकांसोबत काम केले आहे – अगदी तरुण वाचकांसाठीचे कल्पनारम्य लिखाण, जीवनचरित्र, पाककला पुस्तकांपासून ते राज्यशस्त्र, विज्ञान, तंत्रज्ञान आणि कलेवर आधारित सत्येतर पुस्तकांपर्यंत. आमचा अनेक वर्षांचा अनुभव आणि आमचे भाषा तज्ञ आम्हाला कोणत्याही भाषेत आणि कोणत्याही विषयावरील पुस्तकांचे अनुवाद आणि प्रूफरीडिंग करण्यास सहाय्य करतात.
तुमच्या पुस्तकांसाठी आमची मराठी भाषांतर सेवा का निवडावी?
ProofreadingServices.com मध्ये आम्ही तुमची पुस्तकं साहित्यिक अनुवादकांना सुपूर्त करतो. याचाच अर्थ हे अनुवादक केवळ पारंपारिक पद्धती न अवलंबता, तुमचा मजकूराचा प्रकार, त्यातील शैली, लहेजा आणि इतर बारकावे नीट समजून एक परिपूर्ण भाषांतर देऊ करतात.
आम्हाला जगातील लेखकांना सर्वोत्तम अनुवादक आणि इंग्रजी प्रूफरीडर्सच्या संपर्कात येणे सोपे बनवायचे आहे. तुम्ही मुंबई, पुणे नागपूर किंवा इतर कुठेही असलात तरी आमच्या मराठी ते इंग्रजी भाषांतर आणि प्रूफरीडिंग सेवा तुमचा वाचकवर्ग विस्तारून त्यांना तुमच्या पुस्तकांचा आनंद मिळवून देतील. आम्ही उत्तम दर्जाचे काम, उत्कृष्ट ग्राहक सेवा, वाजवी दर आणि आमच्या कामातून समाधानाची हमी देतो.
अनुवादाच्या किमतीचा अंदाज मिळवण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा.