व्यावसायिक ऑनलाईन भाषांतर सेवा
ProofreadingServices.com मराठीमधून इंग्रजीत आणि इंग्रजीतून मराठीत तसेच इतर अनेक भाषांमध्ये व्यावसायिक भाषांतर सेवा उपलब्ध करून देते. इंग्रजी मुद्रितशोधन (प्रूफरीडिंग) आणि जगभरातील अभ्यासक, नोकरी शोधणार्या व्यक्ती, उद्योजक आणि लेखकांसाठीची संकलन सेवा ही आमची खासियत असली तरीही मानवी भाषांतर सेवांद्वारे आम्ही उत्तम दर्जाचे काम, उत्कृष्ट ग्राहक सेवा आणि वाजवी दराची हमी देतो.
भाषांतराच्या किमतीचा अंदाज मिळवण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा.
आम्ही कोणकोणत्या भाषांतर सेवा प्रदान करतो?
तुम्हाला इंग्रजी बोलणार्या एखाद्या देशात, इंग्रजी मासिकात किंवा इतर अशा ठिकाणी काही प्रकाशित करायचे आहे का? आम्ही मराठीतून इंग्रजीमध्ये भाषांतर सेवा उपलब्ध करून देतो, ज्याचे आमच्या इंग्रजी भाषेच्या सहकार्यांकडून वेगळे मुद्रितशोधनदेखील केले जाते.
तुम्हाला तुमचा मजकूर जगातील इंग्रजी न बोलणार्या कोट्यावधी लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे का? आम्ही इंग्रजीतून मराठी, स्विस फ्रेंच, बंगाली, आणि इतर बर्याच भाषांमध्ये भाषांतर सेवा उपलब्ध करून देतो.
आमची वैशिष्ट्ये...
- शैक्षणिक भाषांतर. तुमचे जर्नलमधील लेख, शोध निबंध, प्रबंध आणि थीसिसचे इंग्रजीमधून मराठीत किंवा मराठीतून इंग्रजीत भाषांतर आमच्या टीमवर सोपवा, आणि तुमच्या कामाचे व्यापक प्रकाशन करून त्याचा प्रभाव वाढवा.
-
व्यावसायिक भाषांतर. तुमच्या कंपनीची वेबसाईट, ब्लॉग पोस्ट्स, मार्केटिंग सामुग्री, तसेच व्यवसायवृद्धी आणि नफा कमावण्यासाठी आवश्यक असलेल्या इतर व्यावसायिक मजकूराचे भाषांतर.
- साहित्यिक भाषांतर. तुम्ही खूप मेहनतीने लिखाण केले आहे, मग ती कादंबरी असो, जीवनचरित्र असो किंवा एखादी पटकथा. व्यावसायिक मानवी भाषांतरामुळे तुमची वाचक संख्या अनेक पटींनी वाढू शकते आणि जागतिक स्तरावर लोकांना तुमच्या कामाचा आनंद घेता येऊ शकतो.
ProofreadingServices.com च्या आमच्या भाषातज्ञांनी मुंबई, पुणे, नागपूर तसेच जगभरातील अनेक समाधानी ग्राहकांसाठी हजारो कागदपत्रांचे भाषांतर केले आहे. इतर भाषांतर कंपन्यांपेक्षा वेगळे असेलेले आमचे वैशिष्ट्य म्हणजे आम्ही मराठीतून इंग्रजी भाषांतर सेवेसोबत इंग्रजी मुद्रितशोधनाची (प्रूफरीडिंग) सेवादेखील देऊ करतो, ज्यामुळे भाषांतरित आवृत्त्या अगदी एखाद्या मूळभाषिकाने लिहिल्यासारख्या वाटतात.
आम्ही कोण आहोत?
ProofreadingServices.com च्या अनुवादकांकडे तुमची शैली जपून अचूक भाषांतर करण्याचे ज्ञान आणि अनुभव आहे. आमचे मराठी अनुवादक तंत्रज्ञानापासून ते अर्थशास्त्रापर्यंत विविध विषयांमध्ये निपुण आहेत आणि त्यामुळे तुमचा प्रकल्प तुमच्या क्षेत्राशी परिचित असणार्या सदस्याकडेच सोपवला जाईल. तर मग तुम्हाला एखादे वैयक्तिक विधान हवे असेल, किंवा केस स्टडी किंवा ग्रॅजुएट स्तरावरील एखाद्या दस्तऐवजाचे इंग्रजीतून किंवा इंग्रजीमध्ये भाषांतर हवे असेल, तर तुम्ही निश्चिंतपणे आमच्या मराठी अनुवादकांवर ते सोपवून तुमच्या प्रकल्पाचे उच्च दर्जाचे भाषांतर मिळवू शकता.
आमची मराठी भाषांतर सेवा का निवडावी?
ProofreadingServices.com मध्ये आम्ही जगभरातील लेखकांना, सर्वोत्तम अनुवादक आणि इंग्रजी प्रूफरीडर्सशी सहज संपर्क करण्यास मदत करतो. विविध उद्योग, अभ्यासक व लेखकांसाठी असलेल्या आमच्या किफायतशीर, अचूक भाषांतर सेवांच्या मदतीने तुम्हाला नवीन वाचकांपर्यंत पोहोचून जगातिक बाजारामध्ये वृद्धी करण्यास मदत होईल, मग ती कोणतीही भाषा किंवा कोणताही विषय असो. आम्हाला आमच्या अनुवादकांच्या उच्च दर्जाच्या कामाचा अभिमान आहे आणि आमच्या कामामधून आम्ही तुम्हाला समाधानाची हमी देतो.